जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये भयंकर वाढ झाली आहे. अशात जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील तरुणीला पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीच्या दोघा भावांनी चक्क पोलिसांनी चौकशीला बोलावलेल्या दोघांचे एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेरुन अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आज रविवारी रात्री एमआयडीसी पेालिसांत रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, सुप्रीम कॉलनीतील २१ वर्षीय तरुणी ४ मार्चपासून घरातून बेपत्ता झाली आहे. या तरुणीच्या हरवल्या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल असून मुलीस परिसरातीलच पंकज चतुर राठोड याने पळवून नेल्याचा कुटूंबीयांना संशय असल्याने त्यांनी तशी तक्रार पोलिसांत नोंदवली. एमआयडीसी पेालिसांनी तक्रारीची चौकशी करण्यासाठी शनिवार ५ मार्च रोजी विशाल चतुर राठेाड याला बोलावले होते.

औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज पुढचे ४ तास अंधारातच; कारण…
यावेळी त्याला घेण्यासाठी रोहिदास जाधव, रोहिदास बंडू पवार असे दोघेही नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरुनच त्यांना दुचाकीवर बळजबरी बसवून नेत अपहरण करण्यात आले. त्यानंतर रोहिदास जाधव यांचा मुलगा प्रवीण याला रात्री नऊ वाजता विनायक प्रकाश शेरे, याने मोबाईलवर फोन करुन कळवले की, तुझे वडील रेाहिदास जाधव आणि फुफा रेाहिदास पवार आमच्या ताब्यात असून तूम्ही आमची मावस बहिणीला आणुन द्या आणि दोघांना घेवुन जा, असे सांगत धमकावले. मुलीला आणुन आमच्या घरी आणुन द्या, नंतर दोघांना घेवुन जा असे म्हणत धमकावले.

अशी तक्रार प्रवीण जाधव याने एमआयडीसी पोलिसांत दिल्यावरुन रविवार ६ मार्च रेाजी विनायक प्रकाश शेरे, महेश प्रकाश शेरे अशा दोघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करत आहेत.

‘कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त’; निवडणुकांच्या आधीच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here