बुलडाणा: दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमधून बुलडाण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या चौघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ९वर गेली आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दिल्लीतली निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून १७ जण बुलडाण्यात आले होते. त्यापैकी १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एकाचा १४ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला होता. त्यामुळे त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नव्हते. या १६ पैकी १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आज आणखी चार जणांचे रिपोर्ट आले असून या चौघांनाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. चिखली, देऊळगावराजा आणि खामगाव येथील तिघांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही करोनाबाधित शहरातील नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे बाधित असल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येणार असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. बुलडाण्यात आधीच एकाचा करोनाने मृत्यू झालेला आहे. त्यात आता जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या नऊवर पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यात गेल्या १२ तासांत २६ नवे करोना रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६६१वर गेली आहे. त्यात पुण्यात सर्वाधिक १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये ३ आणि औरंगाबादमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here