वुहान, चीन :

करोनानं जगात शिरकाव केल्याला आता दोन वर्ष उलटलेत. अनेक देशांत करोनाचा प्रभाव कमी झालेला दिसून येतोय. याच दरम्यान चीनमधून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येतेय.

चीनच्या ज्या शहरात करोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता त्याच वुहान शहरात करोना पुन्हा एकदा जोर धरताना दिसून आलाय. गेल्या २४ तासांत वुहानमध्ये करोनाचे ५२६ रुग्ण आढळून आलेत.

महत्त्वाचं म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील एका दिवसाच्या संक्रमणाचा हा सर्वात मोठा आकडा ठरलाय.

चीन सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, समोर आलेल्या ५२६ रुग्णांपैंकी २१४ रुग्णांत करोनाची स्पष्ट लक्षणं आढळून आली. मात्र, ३१२ रुग्ण असे होते ज्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.

दिलासादायक गोष्ट म्हणजे, गेल्या २४ तासांत एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

करोना संक्रमितांच्या आकड्यात झालेल्या वाढीनंतर नागरिकही सतर्क झालेले दिसून येत आहेत.

२४ तासांत करोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं चीनच्या ‘कोव्हिड झिरो धोरणा’ला जोरदार झटका बसल्याचं मानलं जातंय.

वुहानमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत संक्रमित आढळून आल्यानंतर चीनच्या शांघाय, कवान्डांगसहीत अनेक शहरांना रेड अलर्ट देण्यात आलाय. तसंच नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि कोविड नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आलाय.

खळबळ! पॅलेस्टाईन दूतावासात भारतीय राजदूत मुकूल आर्य यांचा मृतदेह आढळलाModi Putin Viral Photo: मोदी आणि पुतीन यांच्या मैत्रिला अशी झाली होती सुरूवात; जुना फोटो व्हायरल
जगाला सतर्क राहण्याची गरज

आतापर्यंत जगभरात करोना रुग्णांच्या संख्येनं ४४.६५ कोटींचा आकडा सहजच ओलांडलाय. तर मृतांचा आकडाही जवळपास ६० लाखांच्या घरात पोहचलाय. गेल्या महिन्याभराच्या आकड्यांवर नजर टाकली तर ५.२२ कोटीहून अधिक रुग्ण समोर आले आहेत.

भारताची स्थिती

भारतात गेल्या २४ तासांत ४,३६२ नवे करोना संक्रमित आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत करोनाच्या दैनंदिन आकड्यात २० टक्क्यांची घट दिसून आलीय. देशात सलग २९ व्या दिवशी दररोजच्या रुग्णांची संख्या एक लाखांहून कमी आढळून येतेय, हाच काय तो दिलासा. याच दरम्यान गेल्या २४ तासांत करोनामुळे गेल्या ६६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

LIVE रशियाकडून युक्रेनमध्ये ‘युद्धविराम’ची घोषणा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

russia ukraine war : रशिया आक्रमक, आता PM मोदी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींशी बोलणार
Ukraine Crisis: रशियाच्या धमकीनंतर पोलंडची माघार, यु्क्रेनला हत्यारं देण्यास नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here