बीजिंग, चीन :

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या १२ व्या दिवशी चीनकडून या विषयावर एक महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलंय. रशिया आणि युक्रेन दरम्यान शांती चर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी रचनात्मक भूमिका सुरू ठेवणार असल्याचं चीननं म्हटलंय.

गरज भासल्यास आपण मध्यस्थतेसाठी तयार असल्याचं वक्तव्य चीन परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. याच वेळी रशिया आणि चीनची मैत्री दगडाप्रमाणे पक्की असल्याचंही वक्तव्य यावेळी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलंय.

रशियाकडून युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांना ‘युक्रेनची मदत केल्यास युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल’ अशी धमकी दिल्यानंतर चीनचं हे वक्तव्य आलंय.

दरम्यान, युक्रेनमध्ये काही लढावून विमानं रोमानिया आणि युक्रेनच्या इतर काही शेजारील देशांत तैनात करण्यात आल्याचा आरोप रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव्ह यांनी रविवारी केला.

LIVE रशियाकडून युक्रेनमध्ये ‘युद्धविराम’ची घोषणा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

करोनाची पुन्हा धडक! चीनच्या वुहान शहरात रुग्णसंख्येची अचानक उसळी
Modi Putin Viral Photo: मोदी आणि पुतीन यांच्या मैत्रिला अशी झाली होती सुरूवात; जुना फोटो व्हायरल
‘लुहान्स्क’ शहर भीषण स्फोटानं हादरलं

युक्रेनमधील लुहान्स्क शहर एका भयंकर स्फोटानं हादरलंय. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर लुहान्स्कमधील एका मोठ्या तेल डेपोनं पेट घेतलाय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी शहराच्या मध्यभागी मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.५५ वाजता हा स्फोट झाल्यानंतर लगेचच तेल डेपोमध्ये आग लागल्याचं समोर आलं.

रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीचा इस्राईलचाही प्रयत्न

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी रविवारी सायंकाळी फोनवरून चर्चा केलीय. युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा पार पडली. रशिया आणि युक्रेन यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी सकाळपासून बेनेट यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही अनेकदा फोनवर चर्चा केलीय.

पंतप्रधान मोदींचा झेलेन्स्की – पुतीन यांच्याशी चर्चा

सोमवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. झेलेन्स्की यांच्याशी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना युद्धभूमीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत मदतीकरता युक्रेनचे आभार मानलेत.

Ukraine Crisis: रशियाच्या धमकीनंतर पोलंडची माघार, यु्क्रेनला हत्यारं देण्यास नकार
खळबळ! पॅलेस्टाईन दूतावासात भारतीय राजदूत मुकूल आर्य यांचा मृतदेह आढळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here