हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वसमत तालुक्यातील एका महिलेची पतीने निर्गुण हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वसमत तालुक्यातल्या पिंपळा चौरे येथे घरगुती वादातून ऊस तोडण्याच्या कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या केली आहे.
सदरील महिलेला तीन मुली आहेत. कुटुंब अल्पभूधारक असून त्यांच्याकडे दोन एक्कर शेती आहे. याची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश तावडे, एपीआय विलास चवळी, पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील गोपींवर, पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अद्याप तरी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नाही आहे.