नाशिक : नाशिकच्या सातपूर परिसरातील एका उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी तब्बल २० ते २५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik Robbery Case)

कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या आणखी एका घटनेनं आज नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. बाबुशेठ नागरगोजे या उद्योजकाच्या घरात घुसून ५ दरोडेखोरांनी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा उद्देमाल लुटला. यावेळी घरातील महिलांना चाकूसह रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दरोडेखोरांनी हा मुद्देमाल लुटून नेला. घरात घुसल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील महिलेच्या कडेवर असलेल्या एक वर्षाच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावत जीवे मरण्याची धमकी दिली आणि महिलांना देव घरात तोंड बांधून कोंडले व लुटमार सुरू केली.

दरोडा यशस्वी झाल्यानंतर महिलांसमोर डान्स

दरोडेखोरांनी घरातील सर्व किमती वस्तू ताब्यात घेतल्या आणि शहरात भरदिवसा दरोडा टाकण्यात यश आल्याच्या आनंदात दरोडेखोरांनी चक्क घरातील महिलांसमोर डान्सही केला. त्यानंतर पाचही दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. घाबरलेल्या महिल्यांनी ताबोडतोब या घटनेबाबत आपल्या नातेवाईकांना आणि पोलिसांना माहिती दिली.

भयानक अपघात! धावत्या कंटेनरमधून पवनचक्कीचे पाते बोलेरोवर पडले आणि…

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळची पाहणी करत डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सातपूर लाहोटी नगर भागातील या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या या दरोड्याच्या घटनेनं शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवलं जातं आहे. तसंच दरोडा टाकून झाल्यानंतर डान्स करत चोरांनी एकप्रकारे पोलिसांना खुलं आव्हानच दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here