मुंबई :शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व २०१९ साली महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनांमधून काही शेतकरी पात्र असतानाही त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा केली होती. तसेच ज्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’चाही पर्याय दिला होता. यातूनही काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेबद्दल काही तक्रारी नाहीत आणि या कर्जमाफी योजनेचे उद्दिष्ट सरकार पूर्ण करेल, असे उत्तर दिले.

ठाकरे सरकारचा काऊंटडाऊन सुरु झालाय; इम्पेरिकल डेटाचं काम आता वेळेत पूर्ण झालं पाहिजे: देवेंद्र फडणवीस
Vidhasabha Adhiveshan: शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडण्याचा आदेश तात्काळ मागे घ्या: देवेंद्र फडणवीस

वीज तोडण्यावरून भाजप आक्रमक

कृषीपंपांची वीज जोडणी तोडण्यावरून भाजप आक्रमक झाला असून, सोमवारी विधानसभेत यावरून जोरदार घोषणाबाजी करण्या आली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली. या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असा आग्रह फडणवीस यांनी धरला. अखेर उर्जामंत्री नितीन राऊत स्पष्टीकरण देतील अशी हमी राज्य सरकारच्या वतीने दिल्यानंतर फडणवीस यांनी माघार घेतली.

OBC reservation bill : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर; ओबीसी आरक्षणासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here