मॉस्को, रशिया :

रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधलाय. उल्लेखनीय म्हणजे, आज सकाळीच पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही संवाद साधला होता. पुतीन यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन संकटाबाबत चर्चा केली.

‘झेलेन्स्की यांच्याशी थेट संवाद साधा’

पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांचा संवाद जवळपास ५० मिनिटांपर्यंत सुरू होता. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी थेट संवाद साधण्याचं आवाहन केलं.

सोमवारी सकाळी रशियानं युक्रेनमधील नागरिकांना शहरं सोडण्यासाठी युद्धविरामची घोषणा केली होती. त्यानंतर पुतीन आणि मोदी यांचा हा संवाद घडून आलाय. आपल्या संभाषणा दरम्यानही मोदी यांनी सूमीसहीत युक्रेनच्या काही भागांत युद्धविराम आणि मानवतावादी कॉरिडॉरच्या घोषणेचं स्वागत केलं. ‘आपल्या टीमशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करावी’ असा आग्रहही मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना केला.

Modi Putin Viral Photo: मोदी आणि पुतीन यांच्या मैत्रिला अशी झाली होती सुरूवात; जुना फोटो व्हायरल
Ukraine Crisis: रशियाच्या धमकीनंतर पोलंडची माघार, यु्क्रेनला हत्यारं देण्यास नकार
पुतीन यांचं मोदींना आश्वासन

सोबतच, सूमीमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुरक्षित सुटकेवरही त्यांनी जोर दिला. यावर, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही पंतप्रधान मोदींना भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी हरएक संभाव्य प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.

उल्लेखनीय म्हणजे, रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात आज (सोमवारी) तिसऱ्यांदा चर्चा पार पडलीय. रशिया आणि युक्रेननं युद्ध तत्काळ स्थगित करून चर्चा आणि राजनैतिक मार्गातून मतभेद दूर करावेत, अशी भूमिका भारतानं सुरूवातीपासून मांडलीय.

China Taiwan: तैवानच्या बाबतीत चीनकडून रशियाच्या ‘कॉपी’चा प्रयत्न, मिळालं जोरदार प्रत्युत्तर
China on Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन दरम्यान मध्यस्थतेसाठी तयार; चीनची शिष्टाई
करोनाची पुन्हा धडक! चीनच्या वुहान शहरात रुग्णसंख्येची अचानक उसळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here