प्रयागराज: उत्तर प्रदेशातीलप्रयागराजमधील करेली येते करोनावरून झालेल्या वादाचे पर्यवसन एका तरुणाच्या हत्येत झाले. लोटन निषाद असे या ३० वर्षीय तरुणाचे नाव असून ही घटना बक्षी मोदा गावात मृत तरुणाच्या घराबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाजवळ रविवारी सकाळी घडली. उपस्थित लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी आणखी दोघांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या तीन आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या बरोबरच आरोपींना कडक शासन करण्याचे आदेशही दिले आहेत. गोळ्या झाडणाऱ्या आरोपीचे मोहम्मद सोना उर्फ सोनू असे असून तो बक्षी मोदा गावचा रहिवाशी आहे.

लोटन निषादअसे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस अधीक्षकांना या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, प्राथमिक तपासानुसार लोटन निषाद याच्या घरासमोर काही व्यक्तींचा एक गट चर्चा करत बसला होता. देशभरात विषाणू संसर्गाबाबत वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यावर ते लोक चर्चा करत होते. त्यांच्यात वाद वाढत गेला आणि त्यांपैकी दोघांनी लोटन निषादवर गोळ्या झाडल्या असा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, मृत तरुण लोटन निषाद याच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

प्रयागराजच्या या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशात लॉकडाऊन असतानाही करेलीच्या बक्षी मोडा गावात चहाच्या दुकानावर लोक कसे जमा झाले, हा प्रश्न आहे. तर, दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचा दावा पोलिस करत आहेत. लोकांना केवळ अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठीच घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे. या मुळे लॉकडाऊन असतानाही चहाच्या दुकानावर झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here