goa exit poll result: Goa Assembly Election Exit Poll Result : काँग्रेस की भाजप?…; गोव्यात त्रिशंकूचा एक्झिट पोलचा अंदाज – goa assembly election 2022 exit poll result bjp congress aap
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) ४० जागांसाठी मतदान झालं. राज्यात आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आश्चर्यचकित करणारेच होते. अनेक पक्ष खूप कमी फरकामुळे सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले आहेत. तर काही पक्ष कमी जागा असतानाही सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. टाइम्स नाऊ-वीटोच्या एक्झिट पोलनुसार, यंदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत नाही. १० मार्चपूर्वी प्रत्येकाचं लक्ष हे एक्झिट पोलच्या अंदाजांवर असते. एक्झिट पोलनुसार यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. टाइम्स नाऊ-वीटोच्या एक्झिट पोलनुसार, गोव्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज आहे. सत्ताधारी भाजपला राज्यात १४ जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. तर काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल असे सांगितले जात आहे. काँग्रेसला १६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला चार आणि इतर पक्षांना सहा जागांवर विजय मिळू शकतो.