कोल्हापूर : रस्त्यावरुन चालत निघालेल्या वृद्धेला वाचवण्याच्या नादात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. तसंच या अपघात वृद्धा गंभीर जखमी झाली आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाट्याजवळ हा अपघात झाला. शितल बाळासो पाटील (वय २८, रा. हरोली, ता. शिरोळ) आणि सूरज श्रीकांत शिंदे (रा. चंदूर, ता. हातकणंगले) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. (Kolhapur Accident News)
या अपघातात दोघांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर वृद्धा गंभीर जखमी झाली. तिला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.