पुणे : खासगी बसमधून गावावरून पाठवलेले वाढदिवसाचे गिफ्ट रिक्षातून घेऊन निघालेल्या दोन विद्यार्थ्यांना मंगळवार पेठेत जबरदस्तीने घेऊन जात लुटल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अनुप शिवहरी शिगोकर (वय १८, रा. ओम सुपर मार्केटजवळ, मॉडेल कॉलनी, मूळ रा. शेगाव, जि. बुलढाणा ) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हा बारावीत शिक्षण घेत आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी शेगावहून भेटवस्तू पाठवल्या होत्या. संगमवाड येथे येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून भेटवस्तूचे खोके पाठवण्यात आले होते. ते खोके आणण्यासाठी रविवारी पहाटे अनुप व त्याचा मित्र सार्थक मालखेडे गेले. त्यांनी प्रवाशी बसमधून खोके ताब्यात घेतले.

वृद्धेला वाचवताना भीषण अपघात; मोटार सायकलवरील दोघे जागीच ठार

रिक्षातून ते मॉडेल कॉलनीत जाण्यासाठी निघाले होते. मात्र रिक्षाचालकाचे काही अंतरावर गेल्यावर त्याचे साथीदार रिक्षात घेतले आणि त्यांना मॉडेल कॉलनीऐवजी मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली घेऊन गेले. रिक्षाचालकाने अंधाारत रिक्षा थांबवली. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी चाकूच्या धाकाने विद्यार्थ्यांना धमकावले. चाकूचा धाक दाखवून अनुपकडील दोन मोबाइल, त्याचा मित्र साथर्कच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड लुटली. तसंच रिक्षाचालाकाने त्यांना धमकावून फोन पेवरून दोन हजार रूपयांची रोकड पाठवण्यास सांगितले. विद्यार्थ्यांना लुटल्यानंतर रिक्षाचालक आणि साथीदार पसार झाले.

दरम्यान, याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here