Live अपडेट्स…
>> तबलीघी जमातीच्या रुग्णांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, तबलीघी जमात घटना वगळली तर करोनाचा डबलिंग रेट ४.१ इतका आहे. तबलीघी जमात मरकझची घटना झाली नसती तर हा रेट आणखी कमी राहिला असता- लव अग्रवाल.
>> देशभरातील २७४ जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव आहे. २४ तासांमध्ये ४७२ नवे रुग्ण आढळले- लव अग्रवाल.
>> २४ तासांमध्ये करोनामुळे ११ लोकांचा मृत्यू- लव अग्रवाल.
>> आज रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे जाळून करोनाशी लढणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवा- लव अग्रवाल.
>> आतापर्यंत करोनाची लागण झालेल्यांपैकी २६७ रुग्ण बरे झाले- लव अग्रवाल
>> आतापर्यंत करोनामुळे ७९ जणांचा मृत्यू- लव अग्रवाल.
>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांची पत्रकार परिषद सुरू.
>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि एच. डी. देवेगौडा यांच्याशी करोनासंदर्भात केली फोनद्वारे चर्चा.
>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, चंद्रशेखर राव, एम. के. स्टालिन, प्रकाशसिंह बादल अशा विविध पक्षांच्या नेत्यांशी बाबत केली चर्चा.
>> नोएडामध्ये ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी वाढवली.
>> उत्तर प्रदेश- वाराणसीतील मदनपुरा, बजरडीहा, लोहता आणि गंगापूर भागांमध्ये जमावबंदीचे आदेश.
>> जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे मजुरांवर उपचार करताना स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी…
>> जम्मू आणि काश्मीरमध्ये पासचा गैरवापर करणाऱ्या तीन शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई.
>> कानपूर: लॉकडाऊनमुळे गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा.
>> उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रुग्णांची संख्या २३ वर, पैकी ३ रुग्ण झाले बरे.
>> लखनऊ येथे केजीएमयूतील १६ रुग्णांना करोना झाल्याचे स्पष्ट.
>> नोएडात आढळले करोनाचे आणखी ८ नवे रुग्ण, नोएडात करोना रुग्णांची संख्या ५८ वर.
>> आज रात्री ९ वाजता लाइट बंद केल्यामुळे ग्रिड फेल होईल ही निव्वळ अफवा- उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा
>> मध्य प्रदेशातील बडवानीच्या संधवा येथे ३ लोकांना करोनाची लागण.
>> गेल्या २४ तासांमध्ये ५२५ नवे करोनाचे रुग्ण आढळले असून देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ३०७२ वर पोहोचली आहे. यांपैकी २१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत ७५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला असून ५८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.
>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या लाइव्ह आर्टिकलमध्ये आपले स्वागत! पाहुयात, करोनाचा संसर्ग आणि देशव्यापी लॉकडाऊनची आज देशभरात काय स्थिती आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times