वृत्तसंस्था, मॉस्को :

युक्रेनने तातडीने लष्करी कारवाई थांबवावी, तटस्थ राहण्यासाठी राज्यघटना बदलावी, क्रिमीयाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, डोनेत्स्क आणि लुगान्स्क या फुटीरतावादी प्रांतांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता द्यावी, अशा अटी रशियाने युक्रेनपुढे ठेवल्या आहेत. या तीन अटींची पूर्तता झाल्यास युद्ध थांबविण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. रशिया सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली. रशिया-युक्रेन संघर्षाच्या बाराव्या दिवशी रशियाकडून युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असल्याची चर्चा आहे. पेस्कोव्ह यांच्या मते, रशियाच्या या सर्व अटींची युक्रेन सरकारला कल्पना आहे. युक्रेन सरकारने जर ठरविले तर तातडीने युद्ध थांबू शकते.

प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, ‘युक्रेनने तातडीने घटनेत बदल करावे. युक्रेनच्या अन्य कोणत्याही भौगोलिक दावा करण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जाणार नाही. आम्ही युक्रेनसाठी निर्लष्करीकरण करीत आहोत. युक्रेननेही त्यांच्या लष्करी कारवाया थांबवाव्यात. त्यांनी गोळीबार आणि हल्ले थांबवले तर आम्हीही ते थांबवू. क्रीमियाच्या मान्यतेवरही युक्रेनने विचार करावा. डोनेत्स्क आणि लुगान्स्क या प्रांतांनाही स्वतंत्र दर्जा आवश्यक आहे.’

युक्रेन संकट : ५० मिनिटांच्या चर्चेनंतर पुतीन यांनी मोदींना दिलं ‘हे’ आश्वासन
China Taiwan: तैवानच्या बाबतीत चीनकडून रशियाच्या ‘कॉपी’चा प्रयत्न, मिळालं जोरदार प्रत्युत्तर
पुन्हा मर्यादित युद्धविराम

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी रशियाने सोमवारी पुन्हा मर्यादित कालावधीसाठी युद्धविरामाची घोषणा केली. युक्रेनमधून बाहेर पडण्याचे बहुतांश मार्ग रशिया आणि बेलारूसमधून जात असल्याने युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अर्थात या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही युक्रेनच्या काही भागांमध्ये रशियाकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. शनिवारी (५ मार्च रोजी) रशियाकडून असाच तात्पुरत्या स्वरूपाचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. काही तासांसाठीच हा युद्धविराम असेल, असे सांगण्यात आले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कीव्हसह अन्य शहरांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. खारकीव्ह आणि सुमीमध्ये अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

पुतिन, झिल्येन्स्की यांच्याशी मोदी यांची चर्चा

रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढत असल्याने आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचा मार्ग खडतर झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन व युक्रेनचे अध्यक्ष व्लाजिमिर झिल्येन्स्की यांच्याशी चर्चा केली. ‘शांततेच्या मार्गाने द्विराष्ट्रीय समस्या सोडवाव्यात,’ असा आग्रह धरतानाच मोदी यांनी सुमी शहरातील भारतीयांच्या सुरक्षित व तातडीच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचा आग्रह दोन्ही देशांच्या प्रमुखांकडे धरला.

युक्रेनची राजधानी किव्ह व खारकिव्ह शहरांतून भारतीयांची सुटका करण्यात आली असली तरी सध्या रशियाचे हल्ले तीव्र झालेल्या सुमी शहरात अजूनही ७०० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.

China on Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन दरम्यान मध्यस्थतेसाठी तयार; चीनची शिष्टाई
खळबळ! पॅलेस्टाईन दूतावासात भारतीय राजदूत मुकूल आर्य यांचा मृतदेह आढळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here