थोड्याचवेळात महाविकासघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निधीवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

Sanjay Raut: निधी वाटपावरून शिवसेनेचे २५ आमदार नाराज; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut: निधी वाटपावरून शिवसेनेचे २५ आमदार नाराज; संजय राऊत म्हणाले…

हायलाइट्स:

  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे
  • यापूर्वी शिवसेनेकडूनचअर्थखात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते
मुंबई: महाविकासआघाडीत अंतर्गत हेवेदावे असल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून केला जातो. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कधीही दगाफटका किंवा अंतर्गत संघर्षामुळे कोसळेल, असे दावेही भाजप नेत्यांनी अनेकदा केले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे २५ आमदार हे निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याचे समजते. यापूर्वी शिवसेनेकडूनचअर्थखात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अजित पवार यांच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही निधीवाटपात कायम राष्ट्रवादीला झुकते माप मिळते, अशी कुजबुज महाविकासआघाडीच्या अंतर्गत वर्तुळात असते. मात्र, यावेळी शिवसेनेच्या काही आमदारांनी याबाबत जाहीरपणे पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या दोन ज्येष्ठ नेत्यांवर आमदारांची समजूत काढण्याची जबाबादरी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नाराज आमदार आता एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यासमोर काय व्यथा मांडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Shiv Sena 25 MLA’S not happy with Fund distribution by government)

थोड्याचवेळात महाविकासघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निधीवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यासंदर्भात चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल. शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्यामध्ये काहीही गैर नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेच्या आमदारांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात पक्षात चर्चा झाली आहे. २५ किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. निधी वाटपातील असंतोषाविषयी हे पत्र आहे. आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर यामध्ये काहीही गैर नाही. राज्यातील प्रत्येक आमदाराचा निधीवर हक्क आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sanjay raut reaction on shiv sena 25 mlas letter to cm uddhav thackeray not happy with fund distribution
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here