औरंगाबाद: औरंगाबादमध्ये करोनावर उपचार सुरू असलेल्या एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील हा करोनाचा पहिलाच बळी आहे.

३ एप्रिल रोजी या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री ८ वाजता त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज दुपारी साडेबारा वाजता उपचार सुरू असताना या व्यक्तीचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला मधूमेह आणि हृदयविकाराचाही त्रास होता, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. घाटी रुग्णालयात येण्यापूर्वी ही व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. ही व्यक्ती अॅडमिट असलेल्या कालावधीत रुग्णालयात आलेल्या रुग्णांची आणि रुग्णालयातील डॉक्टरसह इतर स्टाफचीही तपासणी होणार आहे. तसेच ही व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्यात आला असून त्याच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. हा रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगाबादमध्ये आज पाच जणांना करोनाची लागण झाली असून औरंगाबादमधील रुग्णांची संख्या सातवर गेली आहे. हे पाचही जण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या चालकालाही करोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातवरण निर्माण झालं आहे.

जिल्हा रुग्णालयात दाखल दोन संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा कळविण्यात आले. त्यात ४५ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरुष ( राहणार अनुक्रमे – आरेफ कॉलनी आणि बीड बाय पास) यांचा समावेश आहे. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एका खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही करोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच सिडकोत एन-४ परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने या ठिकाणचा परिसर सील करण्यासाठी पोलीस, प्रशासन घटनास्थळी पोहोचले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here