कीव्ह, युक्रेन :

रशियानं आक्रमण केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याची आवई उठवण्यात आली. मात्र, खुद्द राष्ट्राध्यक्षांनी आपल्या नागरिकांना आणि शत्रुला ‘आपण युक्रेनमध्येच ठाण मांडून बसल्याचं’ सांगितलंय. यामुळे युद्धभूमीवर आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी झगडणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळालंय तर शत्रुसाठी हे आव्हान ठरलंय.

पोलंडला पळून गेल्याच्या अफवा फेटाळून लावतानाच झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष भवनात फेरफटका मारताना दिसून आलेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून झेलेन्स्की यांनी आपण कीव्हमध्येच असल्याचं स्पष्ट केलंय.

मी राजधानी कीव्हमध्येच आहे आणि कुणालाही घाबरत नाही, असं म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाच्या प्रोपोगंडा मशिनरीला थेट आव्हानच दिलंय. आपण कोणत्याही बंकरमध्ये लपून बसलेलो नाही, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

देशभक्तीनं भरलेलं हे युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असेल तेव्हापर्यंत आपण कीव्हमध्येच राहणार असं म्हणत झेलेन्स्की यांनी आपल्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलाय.

Ukraine Crisis: ‘मानवतावादी कॉरिडॉर’चा रशियाचा प्रस्ताव युक्रेनने फेटाळला
Ukraine Crisis: … तरच युद्ध थांबणार, रशियाच्या युक्रेनसमोर अटी
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी राजधानी कीव्ह स्थित राष्ट्राध्यक्ष भवनाच्या कॉरिडोरमध्ये रात्री फेरफटका मारत हा व्हिडिओ शूट केलाय.

शत्रुनं राजधानीला चहूबाजुंनी घेरलेलं असताना आणि जीवाला धोका असताना झेलेन्स्की बेडरपणे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. देश सोडून पळून जाण्याची अमेरिकेची ऑफर त्यांनी युद्धाच्या सुरूवातीलाच फेटाळून लावली होती. उलट, जिवंत असेपर्यंत आपल्या राजधानीमध्येच असेन, असं म्हणत त्यांनी आपल्या नागरिकांना शत्रुविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

‘सोमवारी संध्याकाळी आमचं कार्यालय… सोमवार हा खूप कठीण दिवस आहे असं आपण नेहमीच म्हणत आलो आहोत. आपल्या देशात युद्ध सुरू आहे. त्यामुळे आमच्यासाठी आता प्रत्येक दिवस सोमवार आहे’, असं म्हणताना राष्ट्राध्यक्ष या व्हिडिओत दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष भवनाच्या कॉरिडॉरमध्ये फिरल्यानंतर ते आपल्या खुर्चीत बसले आणि ‘मी इथे कीव्हच्याच बारकोवा रस्त्यावर आहे. मी कुणालाही घाबरत नाही. देशभक्तीनं भरलेलं हे युद्ध जिंकेपर्यंत मी इथेच राहीन’ असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या नागरिकांना आणि रशियाला दिलाय.

दरम्यान, सोमवारी रशियाकडून कीव्ह, खारकीव्ह, सूमी आणि मारियुपोल या शहरांतील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मानवीय कॉरिडोर उपलब्ध करून देण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती.

युक्रेन संकट : ५० मिनिटांच्या चर्चेनंतर पुतीन यांनी मोदींना दिलं ‘हे’ आश्वासन
China Taiwan: तैवानच्या बाबतीत चीनकडून रशियाच्या ‘कॉपी’चा प्रयत्न, मिळालं जोरदार प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here