महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. आता या वर्षी देखील विजेतेपदाच्या शर्यतीत चेन्नईचा संघ आहे. या वर्षी विजेतेपद मिळवल्यास चेन्नई सुपर किंग्ज हे मुंबई इंडियन्सच्या विक्रमी ५ विजेतेपदाशी बरोबरी करतील. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा क्वालिफाय झालेले आणि सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहोचलेला संघ या वर्षी काय कमाल करतो याची उत्सुकता सर्वांना आहे. चेन्नईचा संघ या वर्षी मुंबईत ११ तर पुण्यात ४ लढती खेळणार आहे. जाणून घेऊया त्याचे वेळापत्रक…
वाचा- सुनील गावस्करांनी माफी मागितली; त्या प्रश्नाचे उत्तर देणे चुकीचेच
चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२२चे वेळापत्रक (IPL 2022 Chennai Super Kings Schedule)
२६ मार्च- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, रात्री ७.३०
३१ मार्च- विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, रात्री ७.३०
०३ एप्रिल-विरुद्ध पंजाब किंग्ज, ब्रेबॉर्न स्टेडियम, रात्री ७.३०
०९ एप्रिल- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
१२ एप्रिल- विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
१७ एप्रिल- विरुद्ध गुजरात टायटन्स, एमसीए स्टेडियम पुणे, रात्री ७.३०
२१ एप्रिल- विरुद्ध मुंबई इंडियन्स, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
२५ एप्रिल- विरुद्ध पंजाब किंग्ज, वानखेडे स्टेडियम, ७.३०
०१ मे- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, एमसीए स्टेडियम पुणे, रात्री ७.३०
०४ मे- विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, एमसीए स्टेडियम पुणे, रात्री ७.३०
०८ मे- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
१२ मे- विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, रात्री ७.३०
१५ मे- विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम रात्री ७.३०
२० मे- विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, रात्री ७.३०
वाचा- सामना न खेळता भारतीय खेळाडूला संघाबाहेर केले; दुसऱ्या कसोटीसाठी झाला मोठा बदल