IT raids in Mumbai| शिवसेना नेत्यांच्यापाठी केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा. राहुल कनाल आणि संजय कदम आयकर खात्याच्या रडारवर. अनिल परबही गोत्यात येण्याची शक्यता

IT raids: मुंबईत IT ची आणखी एक धाड; अनिल परब यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर छापा
हायलाइट्स:
- युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर धाड
- यशवंत जाधव यांच्या घरावरही प्राप्तीकर विभागाने धाड टाकली होती
तर दुसरीकडे युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. त्यांच्या वांद्रे येथील घरी आयकर खात्याचे अधिकारी कागदपत्रे आणि इतर गोष्टी तपासत आहेत. त्यामुळे आता या तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावरही प्राप्तीकर विभागाने धाड टाकली होती. तब्बल ७० तास याठिकाणी छापेमारी सुरु होती. त्याचवेळी मुंबईच्या काळाचौकी परिसरातील शिवसैनिक विजय लिपारे यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली होती. गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ सुरु असलेल्या या धाडसत्रांमुळे शिवसेना कोंडीत सापडणार का, हे पाहावे लागेल.
या धाडी सत्तापरिवर्तन नव्हे तर सफाईसाठी: चंद्रकांत पाटील
आयकर खात्याच्या मुंबईतील धाडसत्राविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. काहीजण सुपात आहेत, तर काहीजण जात्यात आहेत. सुपातल्यांना आज ना उद्या जात्यात जावंच लागेल. या धाडी सत्तापरिवर्तन नव्हे तर सफाईसाठी सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, असा नारा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : income tax raids in mumbai probe at anil parab close aid sanjay kadam it raid
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network