औरंगाबाद : एसटीच्या विलिनीकरणाबाबत न्यायालयात समितीने अहवाल सादर केल्यानंतर, परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर औरंगाबाद विभागात रविवारपर्यंत फक्त तीन कर्मचारी सेवेत दाखल झाले आहेत. अजूनही अनेक कर्मचारी हे आंदोलनावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर २०२१मध्ये आंदोलन पुकारण्यात आले. दोन महिन्यांनंतर काही प्रमाणात एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. वेळोवेळी एसटी प्रशासनाकडून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनानंतर औरंगाबाद विभागात १२०० कर्मचारी हजर झालेले आहेत. अजूनही सुमारे १४०० कर्मचारी आंदोलनावर कायम आहेत.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा
विलिनीकरणाचा मुद्दा हा कोर्टात सुनावणीसाठी ठेवण्यात आला आहे. यामुळे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर परत येण्याचे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केले आहे. तसेच, पुन्हा कामावर परत येणाऱ्या कामगारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत, त्या नोटिसा परत घेण्यात येतील, असेही या वेळी सांगण्यात आलेले आहे. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर औरंगाबाद विभागातून शनिवारी सायंकाळपर्यंत फक्त तीन कर्मचारी हजर झालेले होते. अजूनही अनेक कर्मचारी संपावर असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबादचे कर्मचारी आझाद मैदानावर

औरंगाबाद येथे संप करणारे अनेक कर्मचारी हे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला गेलेले आहेत. आगामी ११ मार्च रोजी न्यायालयात सुनावणी असून, या सुनावणीत विलिनीकरण करण्यासाठी न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने येईल. अशी अपेक्षा या आंदोलनावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Kolhapur: कोल्हापुरातील रंकाळा तलावात उडी घेऊन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here