अहमदनगरः ‘नगरमध्ये करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण आलमगीर (ता. नगर) या भागातील रहिवासी असून, तो ३१ वर्षांचा आहे. ‘करोना’बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला ‘करोना’ची लागण झाली आहे,’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत २१ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी दोन रुग्णांचे चौदा दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

येथील जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे आज सकाळपर्यंत ७३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी रविवारी दुपारी ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये आलमगीर येथे राहणाऱ्या एका जणाचा अहवाल हा ‘करोना’ पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला ‘करोना’ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला तातडीने ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये हलवण्यात आले आहे. तर, उर्वरीत ३८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ‘करोना’ची लागण झालेल्यांची संख्या जिल्ह्यात वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here