औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या याच विधानामुळे आता नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, रस्त्यावर उतरून निदर्शने सुद्धा केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी आहे, ‘अशी टीका दानवे यांनी केली होती.

दानवे यांच्या याच विधानाचा निषेध करण्यासाठी नाभिक समाजाच्यावतीने मंगळवारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तर यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना नाभिक समाजाबद्दल अवमान कारक शब्द वापरुन तिरुपती बालाजी येथील नाभिक समाज तिरुमती बालाजी येथे येणाऱ्या भाविकांची अर्धवट काम करून (टक्कल) सोडतो. अशी समाजा विषयी अवमान कारक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून, त्यांचं निषेध करण्यात येत आहे.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा
तर वेळोवेळी काही राजकिय नेतेमंडळी आमच्या समाजाबद्दल बोलून खिल्ली उडवित आहेत. नाभिक समाजाची आणि व्यवसायाची जाणूनबुजून बदनामी करत आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात त्यांच्याविरोधात तीव्र अंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाभिक समाजाने दिला आहे.

ST Strike News : अनिल परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून नो सिग्नल, लालपरी अजूनही जागेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here