हिंगोली : एकंदरीत राज्याचा विचार केला तर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात हिंगोलीमध्ये अशी घटना समोर की ज्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे. खरंतर, हिंगोली शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. आता चक्क पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची दोन मुलं हिंगोली पोलिसांनी फरार घोषित केली आहेत.

इतकंच नाहीतर यांच्यासह अन्य दोन आरोपींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. हिंगोली शहरांमध्ये चार आरोपी फरार असल्याचे बॅनर हिंगोली पोलिसांच्या वतीने लावण्यात आलेला आहे. हिंगोली शहरातील चौकाचौकांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलीसांच्यावतीने बक्षिस सुद्धा देण्यात येणार असल्याचे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रावसाहेब दानवेंच्या अडचणी वाढणार, ‘त्या’ आक्रमक वक्तव्यामुळे नाभिक समाज रस्त्यावर
या चारही आरोपींच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात ३०७ आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल आहेत. दरम्यान, या चार आरोपींपैकी दोन आरोपी हिंगोली मुख्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याची मुले असल्याची माहिती आहे. चार आरोपींपैकी सागर काळे आणि विकी काळे हे दोघे सख्खे भाऊ पोलीस अधिकाऱ्याची मुलं असून करण राजपूत व अक्षय गिरी असे अन्य दोन आरोपींची नावे आहेत.

या पैकी एक आरोपी अटक केल्याची सुद्धा गोपनीय माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. परंतु, पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले अजूनही फरार आहेत. त्यामुळे पोलीस स्वतच्या मुलांना अटक करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ST Strike News : अनिल परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून नो सिग्नल, लालपरी अजूनही जागेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here