ब्रासिलिया, ब्राझील :

आज जगभर ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन‘ साजरा केला जातोय. याच दिवशी ब्राझीलच्या एका नेत्याचं महिलांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय. त्याहून चीड आणणारी गोष्ट म्हणजे या नेत्यानं हे वक्तव्य युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या, मदतीसाठी जगाकडे आस लावून पाहणाऱ्या आणि सोबतच पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून शस्त्रास्त्र हाती घेत युद्धभूमीत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या युक्रेनियन महिलांच्या बाबतीत केलंय.

युक्रेनियन महिला स्वस्त आणि सेक्सी’

युक्रेनमधल्या विध्वंसाची पाहणी करण्यासाठी राजनैतिक मिशनवर दाखल झालेले साओ पाउलोचे ३५ वर्षीय खासदार आर्थर डो वाल यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘युक्रेनियन महिला ‘स्वस्त’ आणि अतिशय ‘सेक्सी’ असल्याचं वाल यांनी म्हटलंय. एका लीक झालेल्या रेकॉर्डिंगमधून ही गोष्ट समोर आलीय.

रशियाच्या हल्ल्यानंत युक्रेनमधील लाखो नागरिक निर्वासित झालेत. अनेकांना युरोपातील इतर देशांत आश्रय घ्यावा लागतोय. ज्यांना हे शक्य झालेलं नाही अशा सर्वसामान्यांना युक्रेनधल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत उघड्यावरच रात्र काढावी लागतेय. या मानवी शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या एका उजव्या विचारसरणीच्या नेत्याचं हे असंवेदनशील विधान अतिशय लाजिरवाणं ठरतंय. यानंतर जगभरातून वाल यांच्यावर जाहीर टीका होतेय.

‘मी आता पायी चालतच युक्रेन आणि स्लोवाकियाची सीमा ओलांडली. शपथेवर सांगतो मी एवढ्या सुंदर मुली अगोदर कधीच पाहिल्या नाहीत. निर्वासितांची रांगच रांग… २०० मीटरहून लांब ही रांग होती आणि त्यामध्ये अतिशय सुंदर स्त्रियांचा समावेश आहे. या स्त्रिया इतक्या सुंदर आहेत की ब्राझीलच्या नाईट क्लबच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या मुलींची त्यांच्याशी तुलनाही केली जाऊ शकत नाही’ असं वाल यांनी वक्तव्य केल्याचं लीक झालेल्या रेकॉर्डींगमधून समोर आलंय.

Watch Video: जगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच! युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर…Ukraine Crisis: युक्रेन जवानांच्या जिद्दीनं भारावला भारतीय तरुण, रशियाविरुद्ध युद्धात सहभागी
युद्धभूमीतल्या सैनिकांविषयी अपशब्द

‘द गार्डियन’नं दिलेल्या माहितीनुसार, आर्थर वाल यांनी या महिलांना ‘स्वस्त’ म्हटलं कारण या निर्वासित महिला आर्थिकरित्याही उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहेत. ‘युद्ध संपेल तेव्हा मी इथे परत येईन’ असं वक्तव्यही वाल यांनी केलंय. वाल यांनी युक्रेन आणि स्लोवाकियाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांसाठीही अपशब्द वापरल्याचं समोर आलंय.

चूक केली कबूल

यावर, ‘अत्यंत दरिद्री विचारसरणी असलेल्यांनो, थोडा तरी आदर दाखवा’ असं म्हणत ब्राझीलमधील युक्रेनच्या माजी राजदूतांच्या पत्नीनं आर्थर वाल यांच्या विधानावर जोरदार टीका केलीय. चहूबाजुंनी टीका झाल्यानंतर आर्थर वाल यांनी आपली चूक कबूल केलीय.


युद्ध महिलांना सर्वच पातळीवर उद्ध्वस्त करणार?

युक्रेनमधील लाखो लोक आपला जीव वाचवण्यासाठी पोलंड आणि रोमानियासारख्या देशांमध्ये स्थलांतर करत आहेत. यामध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. युद्धामुळे या महिलांवर देहव्यापाराच्या अंधारात लोटल्या जाऊ शकतात, असा धोका व्यक्त केला जातोय.

Watch Video: मी कीव्हमध्येच, कुणालाही घाबरत नाही; आपल्या कार्यालयातून झेलेन्स्की गरजलेUkraine Crisis: … तरच युद्ध थांबणार, रशियाच्या युक्रेनसमोर अटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here