जळगाव: बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी (वय २९) यांचा प्रेमसंबंधाच्या संशयावरून गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघड झाली. पारधी हे बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी या हत्येच्या घटनेची उकल केली. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बोदवड पोलिसांनी या प्रकरणात नऊ संशयितांना अटक केली.

उच्चशिक्षित असलेले शिवाजी पारधी हे मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य होते. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत ६ मार्चला रात्री त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी बोदवड पोलिसांत शिवाजी हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. रविवारी रात्री मलकापूर रोडवरील पुलाखाली मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी काही वेळातच ओळख पटवली. मृतदेह शिवाजी पारधी यांचा असल्याचे समोर येताच, अवघ्या काही तासांतच म्हणजे सोमवारी, दुपारी २ वाजता संशयितांना अटक करण्यात आली.

संशयितांमध्ये रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय २१), सचिन श्रीधर कोल्हे (वय ३२), श्रीधर रामधन कोल्हे (वय ५९), अमोल श्रीधर कोल्हे (वय ३०), नितीन भास्कर कोल्हे (वय ३२), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (वय ५०, सर्व रा.मुक्तळ) व पुंडलिक यशवंत वारके (वय ४९) व पल्लवी पुंडलिक वारके (वय ३६, रा. शिंदी ता.भुसावळ) आदींचा समावेश आहे. घटनेशी निगडीत एका विवाहित तरुणीसोबत मृत शिवाजी पारधी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपींनी शिवाजीला मारहाण व त्यानंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. नंतर मृतदेह ५ मार्चच्या रात्री दीड वाजता मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

लष्करातील जवानाचं तरुणीसोबत भयंकर कृत्य; लग्न, हनिमुन आणि २ दिवसांनंतर…

ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाला घटनास्थळावरून मिळाले महत्वाचे पुरावे

पोलिसांना घटनास्थळी काही वस्तू आढळल्या. जळगाव येथील ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथकाचीही मदत घेण्यात आली. या प्रकरणी सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींना सोमवारी बोदवड न्यायालयात हजर केल्यावर ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करत आहेत. सोमवारी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे हे रविवारी रात्रीपासून बोदवड येथे तपास करत होते.

यू-ट्यूबवर पाहून केली अफूची शेती; कापणीसाठी १५ दिवस असताना पोलिसांकडून दणका!
७५ वर्षीय शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ट्यूशनला बोलावले आणि…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here