Sanjay Raut Kirit Somaiya | ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रेही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली होती. माझ्याकडे आणखी काही कागदपत्रे आहेत. ही कागदपत्रे मी टप्याटप्याने उघड करेन, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत आणि किरीट सोमय्या
हायलाइट्स:
- २०१६ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि राकेश वाधवान यांच्याविरोधात अचानक तक्रार करणे बंद केले
- १ डिसेंबर २०१६ रोजी नील सोमय्या यांची निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदी वर्णी लागली
त्यानंतर २०१६ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि राकेश वाधवान यांच्याविरोधात अचानक तक्रार करणे बंद केले. त्यानंतर १ डिसेंबर २०१६ रोजी नील सोमय्या यांची निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदी वर्णी लागली. त्यानंतर निकॉन इन्फ्रास्ट्रक्टरला ५१६८ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ विकसत करण्याचे अधिकार मिळाले. हे अधिकार राकेश वाधवान यांच्याकडून विकत घेण्यात आले होते. किरीट सोमय्या यांचा फ्रंटमॅन देवेंद्र लधानी यांच्या साई रिधम कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाले. वसईमध्ये साई रिधम कंपनीच्या जमिनीवर निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला दोन प्रकल्प उभारण्याची परवानगी मिळाली. या जमिनीचे मूळ मालक राकेश वाधवान होते. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणात किरीट सोमय्या यांनी इतके आरोप केले असतानाही त्यांच्या मुलाचे राकेश वाधवान यांच्या कंपनीशी संबंध कसे असू शकतात? किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून ही जमीन मिळवून दिली होती का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
तसेच या सगळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. आता नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसला तरी तो भविष्यात दाखल होऊ शकतो. मार्क माय वर्डस, बाप-बेटे हे काही झाले तरी जेलमध्ये जातीलच, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : shiv sena mp sanjay raut allegations on kirit somaiya and neil somaiya
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network