मुंबई : राज्यात विविध विभागांत लाखो पदे रिक्त असून मागील पाच-सहा वर्षांत सरकारी नोकरभरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरूण या भरतीची वाट पाहत आहेत. विविध विभागांतील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी ९ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकरभरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार? मागील सरकारच्या काळातही नोकरभरती केली गेली नाही. या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागांत रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भरती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही; मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं…
Thane : आदिवासी माणूस ढोर नाही…ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांनी दणाणले, श्रमजीवी संघटनेचा पुन्हा मोर्चा

राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. करोनामुळे मागील दोन वर्षांत पदभरती झालेली नाही. सरकार ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.

Vidhan Sabha Adhiveshan: फडणवीसांच्या भाषणावेळी गिरीश महाजन आणि शेलारांचं नेमकं काय चाललं होतं; सभागृहातला व्हीडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here