मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात सुरू झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीर टॅपिंग केले, हे सिद्ध झाले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते, हे उघड होण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीच्या पैशांवर पक्ष चालवणारे कोण आहेत? त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करा, असंही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारकडून भाजप नेत्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट करणारे व्हिडिओ असलेला पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन, सीबीआय चौकशीची मागणी करून खळबळ उडवून दिली. त्यावेळी विधानसभेतील चर्चेत भाग घेताना नाना पटोले यांनी भाजप आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला. पटोले म्हणाले की, ‘महाराष्ट्र हे पुरोगामी व कायद्याचे राज्य आहे. राज्यात गुन्हेगारी प्रवृतीला थारा दिला जाऊ नये अशीच सर्वांची भूमिका आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप केला; परंतु माझ्यासह अनेक राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्याचे काम कोणत्या सरकारमध्ये झाले, हे स्पष्ट झाले असून, गुन्हाही नोंदला गेला आहे. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा वापर कुणी केला व कशासाठी केला हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सरकारने चौकशी करून अहवाल सादर केला पाहिजे.’ बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध ठेवणे चुकीचे आहे, इक्बाल मिर्ची या बॉम्बस्फोटातील आरोपीची देणगी कोणत्या पक्षाला मिळाली? कुख्यात गुंड ज्याचा बॉम्बस्फोटात सहभाग होता, त्याचा पैसा कसा चालतो? त्याची चौकशी झाली पाहिजे व ज्या पक्षाने तो पैसे वापरला त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. फडणवीस सरकारच्या काळापासून सुरू झालेली गुन्हेगारी थांबली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

Devendra Fadnavis On Nawab Malik : नवाब मलिक सुटले तर घ्या पुन्हा मंत्रिमंडळात, सत्कार करा पण….; फडणवीस राजीनाम्यावर ठाम
allegations by fadnavis: फडणवीस यांचा सरकारवर मोठा आरोप; पुराव्यांचा सव्वाशे तासांचा पेन ड्राइव्ह केला सादर

‘मुंबई सहकारी बँकेतील घोटाळेबाजांवर कारवाई झाली पाहिजे’

भीमा-कोरेगावचे प्रकरण राज्यात झाले. शौर्य स्तंभावर लाखो लोक नमन करायला जातात, पण त्यादिवशी दुकाने बंद करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोयही केलेली नव्हती. त्यानंतर राज्यात दंगली झाल्या. या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडे होती, मग पहाटेचे सरकार आले त्यावेळी हे प्रकरण केंद्र सरकारच्या एनआयकडे का दिले गेले? त्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती कुठून सुरू झाली, त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. गुन्हेगारी वाढू नये हीच सर्वांची इच्छा आहे. माझी मागणी आहे की भीमा कोरेगाव प्रकणानंतर राज्यात दंगली उसळल्या, दलित समाजातील लोकांवर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे मागे घ्यावेत, असे पटोले म्हणाले. मुंबई सहकारी बँकेच्या माध्यमातून लुटण्याचे काम केले, ते लोकही पदावर आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मुंबई सहकारी बँकेतील घोटाळेबाजांवर कारवाई झाली पाहिजे. कायदा सर्वांना सारखा असला पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

किरीट सोमय्यांनी राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून मुलाच्या कंपनीसाठी जमीन मिळवली; संजय राऊतांचा आरोप

‘ओबीसी राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे’

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, २०१७ साली ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुरू झाला. ज्या जिल्हा परिषदांमध्ये हा प्रश्न होता, त्या जिल्हा परिषदांवर प्रशासक बसवला गेला. पण नागपूर जिल्हा परिषद दोन वर्षे कशी चालली? त्यावेळी फडणवीस यांचेच सरकार होते. ओबीसी आरक्षण प्रश्नी आयोग बसवून ट्रिपल टेस्ट करा, असे निर्देश कोर्टाने दिले होते, मग भाजप सरकारने त्यावर निर्णय का घेतला नाही? ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here