करोना व्हायरसला रोखण्यासाठी भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आता पुढे सरसावला आहे. करोना व्हायरसला पळवण्यासाठी सरकार काही पावले उचलते आहे. आता सरकारला मदत करण्यासाठी युवराज पुढे सरसावला आहे. युवराजने ५० लाख रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यक निधीला केली आहे.

काही दिवसांपूर्वी युवराज हा अन्य क्रिकेटपटूंनी केलेल्या मदतीचे कौतुक करत होता. पण आता युवराज स्वत:हून या लढाईमध्ये उतरला आहे. यासाठी त्याने ५० लाख रुपयांची मदतही केली आहे.

युवराजने याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये युवराज म्हणाला की, ” जोपर्यंत आपण एकजूट होत नाही तोपर्यंत आपण ही लढाई जिंकू शकत नाही. त्यामुळे आज रात्री ९ वाजता सर्वांनी एकजूट दाखवायला हवी, हे आवाहन मी देशवासियांना करत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मदत निधीसाठी मी ५० लाख रुपयेही देत आहे.”

हरभजन करतोय ५ हजार कुटुंबियांना मदत
सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण या गरजूंना अन्न-धान्य मिळावे यासाठी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढे सरसावला आहे. तब्बल पाच हजार कुटुंबियांना तो अन्न-धान्य पुरवत असल्याचे दिसत आहे.

पंजाबमधील जालंधर येथे सध्या बिकट अवस्था आहे. कारण बहुतांशी लोकांना अन्न-धान्याचा पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पण या कुटुंबियांसाठी हरभजन हा देवदूत ठरला आहे. जालंधर येथील पाच हजार कुटुंबियांच्या अन्न-धान्याच्या प्रश्न हरभजनने सोडवला आहे.

याबाबत हरभजन म्हणाला की, ” सध्याच्या घडीला काही कुटुंबियापुढे अन्न-धान्याचा प्रश्न बिकट होत चालला होता. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्न-धान्य कसं मिळेल, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या पाच हजार कुटुंबियांचा अन्न-धान्याचा प्रश्न आम्ही तुर्तास सोडवला आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here