महाड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये धक्कादायक घटना घडली. जप्त केलेल्या स्फोटकांची विल्हेवाट लावताना स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या कांबळे तर्फ महाड गावाजवळ ही दुर्घटना घडली. पोलिसांनी जप्त केलेली स्फोटके नष्ट करताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस नाईक रमेश राघोपुते, हेड कॉन्स्टेबल महादू लडगे अशी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ते दोघेही बीडीडीएस विभागाचे कर्मचारी आहेत.

महाडच्या छबिना उत्सवामध्ये अपघात; आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

स्फोटके निकामी करताना झाला स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २०१२ साली खाणकामासाठी वापरण्यात येणारे जिलेटिन आदी मुद्देमाल पकडला होता. ही स्फोटके निकामी करत असताना, या स्फोट झाला. मुंबई – गोवा महामार्गाजवळील कांबळे तर्फ महाड गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना मुंबईतील रुग्णालयांत केले दाखल

स्फोटके निकामी करताना स्फोट झाला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील रुग्णालयांत नेण्यात आले. महाड ते मुंबईपर्यंत या रुग्णांना घेऊन जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग ग्रीन कॉरिडोर म्हणून घोषित करण्यात आला. यावेळी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खोपोलीत केमिकल कंपनीला भीषण आग; ४-५ किलोमीटरवर धुराचे लोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here