म. टा. वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. ज्वलनशील पदार्थांमुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर औद्योगिक वसाहतीमधील कुंभवली नाक्याजवळील प्लॉट एन – ९६ येथील निर्भया केमिकल्स या रासायनिक कंपनीमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली. कंपनीत उत्पादन सुरू असताना ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत होते.

Palghar : दुर्दैवी! केळवे समुद्रात २ बालकांसह ४ जण बुडाले
Mahad Blast : महाडमध्ये स्फोट; २ पोलीस कर्मचारी जखमी

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब सुरुवातीला घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र रासायनिक पदार्थांच्या साठ्यामुळे आग आणखीनच भडकली. आग लागलेल्या या कंपनीमधील सर्व कामगार सुखरूप बाहेर पडल्याचे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here