Income Tax raid | आयकर खात्याने अंधेरीतील शिवसेना संघटक संजय कदम यांच्या घरावरही छापा टाकला होता. शिवसेना नेत्यांवर सध्या एकापाठोपाठ एक आयकर खात्याच्या धाडी पडत आहेत.

अनिल परब, परिवहन मंत्री
हायलाइट्स:
- मंगळवारी सकाळी सहा वाजता आयकर खात्याचे अधिकारी या सगळ्यांच्या घरी दाखल झाले होते
- निल परब यांचे लेखापरीक्षक (सीए) यांच्या घरावरही आयकर खात्याचा छापा
तर दुसरीकडे आयकर खात्याने शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावरही मंगळवारी सकाळी सहा वाजता छापा टाकला होता. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत राहुल कनाल यांच्या घरी झाडाझडती सुरु होती. यावेळी अधिकाऱ्यांनी राहुल कनाल यांना काही प्रश्नही विचारल्याचे समजते. रात्री ११ वाजता आयकर विभागाचे पथक राहुल कनाल यांच्या घरातून बाहेर पडले. राहुल कनाल यांच्या घरावर छापेमारी सुरु असताना युवासेनेचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले होते. आयकर विभागाचे अधिकारी बाहेर पडल्यानंतर राहुल कनाल यांनी मध्यरात्री घराबाहेर जमलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.
काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी अधिकारी तब्बल ७० तास यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. यशवंत जाधव यांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा इतरत्र वळवल्याचा आरोप होता. त्यादृष्टीने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरातील प्रत्येक कागदपत्राची कसून तपासणी केल्याचे समजते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : income tax raid at shivsena leader anil parab ca house in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network