वृत्तसंस्था, न्यूयॉर्क :

मानवी कॉरिडॉरचे उल्लंघन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशिया व युक्रेनने परस्परांवर आरोप केले आहेत. युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांसह सर्व नागरिकांना बाहेर पडण्यासाठी दोन्ही देशांनी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहन भारताने केले आहे. मात्र, संबंधिक कॉरिडॉरला खोडा घातल्याचे आरोप दोन्ही देशांनी एकमेकावर केला आहे.

युक्रेनचे संयुक्त राष्ट्रांतील कायम प्रतिनिधी राजदूत सर्जी किस्लीत्स्या यांनी या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बाजू मांडली. भारत, चीन, टर्की, पाकिस्तान आणि इतर देशांसह युक्रेनमधील सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांना रशियाच्या आक्रमणामुळे सोमवारी त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. विविध देशांतील नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी पाठवण्यासाठी युक्रेनचे सरकार संबंधित देशांचे दूतावास आणि वकिलातींशी सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले. युक्रेन सरकारने तातडीची हॉटलाइन सुरू केल्याचेही ते म्हणाले.

Ukraine Crisis: युक्रेनच्या महिला स्वस्त आणि सेक्सी; ‘महिला दिनी’ नेत्याच्या ‘दरिद्री’ विचारांची पोलखोल
Watch Video: जगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच! युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर…

तमिळनाडूतील युवक युक्रेनसाठी रणांगणात

भारतीय लष्करात सहभागी होण्याची संधी हुकलेला; पण एक तरुण सध्या युक्रेनच्या बाजूने रशियाशी दोन हात करीत आहे. एकवीस वर्षांचा हा तरुण कोइम्बतूरमधील असून, त्यचे नाव सैनिकेश रविचंद्रन असे आहे.

सैनिकेशची माहिती मिळ‌विण्यासाठी काही केंद्रीय संस्थांचे प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या थुडियलूर गावात गेले होते. त्या वेळी त्यांना ही माहिती मिळाली.

सैनिकेशच्या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांना सांगितले, की तो युक्रेनमध्ये सध्या एरोस्पेस इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याच बरोबर एका व्हिडिओ गेम विकसित करणाऱ्या कंपनीत तो नोकरीही करतो. युद्ध सुरू होण्यापूर्वी काही दिवसच त्याने ही नोकरी पत्करली होती. सैनिकेशचा शोध घेऊन त्याला भारतात परत आणावे, अशी कळकळीची विनंती त्याच्या पालकांनी सरकारकडे केली आहे.

सैनिकेशने २०१८मध्ये खारकीव्हमधील नॅशनल एरोस्पेस युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने जॉर्जियन लिजियन या निमलष्करी दलात स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. तो त्यांच्या वतीने रशियाविरोधात लढत आहे. उंचीच्या निकषांत न बसल्यामुळे सैनिकेशला दोन वेळा लष्कर भरतीतून बाद ठरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांने अमेरिकेच्या लष्करात भरती होण्यासाठी भारतातील अमेरिकी वाणिज्य दूतावासातही संपर्क साधला होता. मात्र, तोही निष्फळ ठरला.

Ukraine Crisis: युक्रेन जवानांच्या जिद्दीनं भारावला भारतीय तरुण, रशियाविरुद्ध युद्धात सहभागी
Watch Video: मी कीव्हमध्येच, कुणालाही घाबरत नाही; आपल्या कार्यालयातून झेलेन्स्की गरजले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here