Live Updates मुंबई- राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा सरकारने राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कारवाईनंतरही ते मंत्रीमंडळात कसे असा प्रश्न फडणवीसांनी यावेळी विचारला होता. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्च्यात भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

– मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.

– सुरुवातीला हा धडक मोर्चा भायखळाहून आझाद मैदानाकडे निघणार होता. मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.

– देवेंद्र फडणवीस आझाद मैदानाकडे जाण्यासाठी रवाना

– मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.

– भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानात पोहोचले.

– थोड्याच वेळात भाजपच्या धडक मोर्चाला होणार सुरुवात

– आझात मैदानात हजारो पदाधिकारी बसतील अशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

– मुंबईच्या आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सिग्नल पर्यंत हा मोर्चा निघणार

– वातावरण निर्मिती आझाद मैदानावर करण्यात आली आहे.

नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here