सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. करोना व्हायरसचा फटका भारताच्या क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. सध्याच्या घडीला सर्वच खेळाडू आपल्या घरामध्येच आहेत. पण यावेळी एक आंतरराष्ट्रीय पदकविजेती खेळाडू चक्क रस्त्यावर झाडू मारताना दिसत आहे. ही खेळाडू नेमकी आहे तरी कोण, याची चर्चा आता चाहते करत आहेत.

सध्या भारतामध्ये सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. जगभरातही एकही स्पर्धा नाही. त्यामुळे खेळाडू घरीच बसून आहेत. त्याचबरोबर खेळाडूंना सरावही करता येत नसल्याचे दिसत आहे.

काही खेळाडू आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. पण या खेळाडूचा व्हिडीओ तिने नाही तर अन्य कोणीतरी काढल्याचे दिसत आहे. या आंतरराष्ट्रीय खेळाडूला झाडू मारताना पाहून चाहते चक्रावले आहेत. यापुढील व्हिडीओमध्ये तुम्हाला ही खेळाडू दिसू शकते…

ही रस्त्यावर झाडू मारणारी खेळाडू नेमकी आहे तरी कोण, हे आता तुम्हाला समजले असेल. जर अजूनही कुणाला समजले नसेल तर ही आहे भारताची फुलराणी महिला बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिकपद विजेती खेळाडू सायना नेहवाल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here