मॉस्को, रशिया :

रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धपरिस्थिती १४ व्या दिवशीही कायम आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर जवळपास ३०० तास उलटून गेलेत. या ३०० तासांत भारत, इस्राईल आणि फ्रान्स यांच्यासहीत अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. अमेरिका आणि इतर देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी निर्बंधांचा वापर केला. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, रशियावर निर्बंध लादणारे केवळ वेगवेगळ्या देशांचे सरकार नाहीत तर अनेक खासगी कंपन्यांनीही या युद्धात ठाम भूमिका घेत रशियावर आपापल्या परीनं निर्बंध लादलेत. जगातील ३०० हून अधिक ब्रॅन्डस् आणि कंपन्यांनी रशियाला अडचणीत आणण्यासाठी या देशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या कंपन्यांनी रशियातील आपलं कामकाज गुंडाळलंय.

खासगी कंपन्यांकडून रशियावर निर्बंध

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला वैश्विक निंदेला सामोरं जावं लागतंय. यानंतर अनेक कंपन्यांनी रशियावर निर्बंध जाहीर करत मॉस्को आणि इतर शहरांतील आपले आऊटलेट बंद केलेत. याचा परिणाम थेट रशियातील नागरिकांवर होतोय. ‘येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट‘च्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन आठवड्यांत ३०० हून अधिक कंपन्यांनी रशिया सोडलंय.

volodymyr zelenskyy: रशियासोबत ‘तडजोडी’साठी युक्रेन तयार? ‘नाटो’ संदर्भात झेलेन्स्की यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Ukraine Crisis: रशियाला ‘दहशतवादी देश’ म्हणून घोषित करा, झेलेन्स्की यांची मागणी
मॅकडोनल्डस्‘चे ८५० रेस्टॉरन्ट बंद

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मॅकडोनल्डस्’नं रशियातील आपले ८५० रेस्टॉरन्टस सध्या तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. याची माहिती कर्मचाऱ्यांना एका जाहीर पत्राद्वारे देण्यात आलीय. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या मानवीय प्रश्नांवर मॅकडोनल्डस् डोळेझाक करू शकत नाही, असं कंपनीनं आपल्या पत्रात म्हटलंय. मात्र, आपल्या कर्मचाऱ्यांचं हित ध्यानात घेता रशियातील ६२ हजार कर्मचाऱ्यांना पगार मात्र मिळत राहील, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, मॅकडॉनल्डसकडे रशियाच्या रेस्टॉरन्टचा ८४ टक्के सहभाग आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा ९ टक्के वाटा होता.

३०० हून अधिक खासगी कंपन्या युक्रेनच्या मदतील सरसावल्या

यापूर्वी, केएफसी आणि पिझ्झा हट यांनीही रशियात आपली गुंतवणूक आणि विकास थांबवण्याचा निर्णय जाहीर केलाय.

याआधी आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपनी शेल, जर्मन स्पोर्ट्सवेअर निर्माता आदिदास, सौंदर्य प्रसाधनं कंपनी एस्टी लेडर आणि कॅल्विन क्लेन या कंपन्यांनीही रशियातील आपले उपक्रम गुंडाळण्याची घोषणा केली आहे. कार निर्माता ‘फोक्सवॅगन’नं रशियाकडून अनेक हायब्रिड मॉडेल्सची ऑर्डर घेणं बंद केलंय.

यासोबतच वॉल्ट डिस्ने, पॅरामाउंट पिक्चर्स, सोनी कॉर्प आणि एटी अॅन्ड टी इंकच्या वॉर्नरमीडिया आणि कॉमकास्ट कॉर्पच्या युनिव्हर्सल पिक्चर्स या हॉलिवूड स्टुडिओनंही रशियातील चित्रपटांचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय जाहीर केलाय. येत्या काही दिवसांत इतरही आणखी काही कंपन्या रशियाविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Watch Video: जगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच! युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर…
Ukraine Crisis: युक्रेन जवानांच्या जिद्दीनं भारावला भारतीय तरुण, रशियाविरुद्ध युद्धात सहभागी
अमेरिकेकडून रशियाच्या तेल-कोळसा आयातीवर बंदी

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांना रशियन तेलाची आयात कमी करण्याची वारंवार विनंती केल्यानंतर अमेरिकेनं रशियाकडून तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयातीवर बंदी घातली आहे. ब्रिटननंही या वर्षाच्या अखेरीस रशियाकडून तेल आणि तेल उत्पादनांची आयात टप्प्याटप्प्यानं बंद करण्याची घोषणा केलीय. तर ‘युरोपियन युनियन’नं या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियन गॅसवरील आपले अवलंबित्व दोन तृतीयांश कमी करण्याची तयारी केलीय.

रशिया-युक्रेन युद्धावर ठाम भूमिका घेणाऱ्या कंपन्या…

– रोलेक्स
– मॅकडोनल्डस्
– कोको कोला
– पेप्सिको
स्टारबक्स
– नेटफ्लिक्स
– टिक टॉक
– सॅमसंग
– वीसा
– मास्टर कार्ड
– अमेरिकन एक्सप्रेस
– जनरल इलेक्ट्रिक
– जनरल मोटर्स
– फोर्ड मोटर कंपनी
– वोक्सवॅगन एजी
– टोयोटा मोटर कार्पोरेशन
– वोल्वो एबी
– डेमलर ट्रक होल्डिंग AG
– सीप
– युनिलीव्हर
– लेवी स्ट्रॉस अॅन्ड कंपनी
– माइक्रोसॉफ्ट
– सेब
– नाइके
– कोंडे नास्तो
Ukraine Crisis: युक्रेनमध्ये पाकिस्तानच्या ‘अस्मा’ला भारताचा मदतीचा हात! मानले मोदींचे आभार
युक्रेन संकट : ५० मिनिटांच्या चर्चेनंतर पुतीन यांनी मोदींनी दिलं ‘हे’ आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here