नागपूर : नागपूरमध्ये महिला अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून युवकाने अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. स्वप्निल किसन बर्वे (वय २७, रा. पेंढरी), असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो श्रमिक आहे. पीडित महिला दोन मुलांसह पतीपासून वेगळी राहते. याचाच फायदा घेत स्वप्निलने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि लग्नाची स्वप्न दाखवली.

मोठी बातमी! राज्यात लवकरच पेट्रोल टंचाईची शक्यता, ‘इतक्या’ रुपयांनी महागणार इंधन
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे स्वप्निल याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. दोघेही दीड वर्षांपासून ‘लिव्हइन’मध्ये राहायला लागले. काही दिवसांपूर्वी स्वप्निल याचे अन्य तरुणीसोबत साक्षगंध झाले. याबाबत पीडित महिलेला कळताच तिने स्वप्निल याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून तिला ठार मारण्याची धमकी दिली.

यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक डी. जी. पळनाटे यांनी स्वप्निल याला तातडीने अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ट्रॅक्टरसाठी सासरच्यांनी केला विवाहितेचा छळ; महिलेने उचलेले टोकाचे पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here