नवी दिल्ली: आयपीएलच्या १५व्या हंगामाला थोड्याच दिवसात सुरूवात होणार आहे. या वर्षी नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायट्स संघ वादात सापडला आहे. मंगळवार ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त लखनौ संघाने शेअर केलेल्या फोटोवरून वाद झाला आणि शेवटी या नव्या संघाला सोशल मीडियावरून माफी मागावी लागली.

वाचा- IPL सुरू होण्याआधी लखनौला बसला मोठा झटका; या स्टार खेळाडू शिवाय कसा खेळणार संघ

लखनौ संघाने त्याच्या ट्विटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत भारतीय महिला संघातील सदस्यांचे फोटो होतो आणि या सर्वांना शुभेच्छा दिल्या. हा फोटो शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला. कारण संबंधित फोटो एका फॅन पेजने तयार केला होता आणि लखनौ संघाने त्याचे श्रेय न देता तो वापरला होता.

वाचा- क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक मोठे बदल; फलंदाजाला आता अशा पद्धतीने बाद

सुपर जायट्स संघाने जेव्हा क्रेडिट न देता फोटो शेअर केला तेव्हा चाहत्यांनी त्यावर आक्षेप घेतला. इतक नाही तर ज्या फॅन पेजने हा फोटो तयार केला होता त्यांनी देखील आक्षेप घेतला. संबंधित फॅन पेज Women In Blue- Memories ने म्हटले की, हे बघा डिजिटल चोर. अकाउंट फेरिफाय झाले तर काहीही करतात. आम्ही घेतलेल्या मेहनतीवर स्वत:चे इफेक्ट लावून शेअर केला.

वाचा- शेन वॉर्न एकाच वेळी दोन महिलांकडून घेत होता मसाज; निधनाच्या आधीचे CCTV फुटेज

सोशल मीडियावर अन्य चाहत्यांनी देखील लखनौ संघावर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर लखनौ संघाने फोटोला क्रेडिट दिले आणि माफी देखील मागितली. संघाने म्हटले, मुझको राणाजी माफ करना, गलती म्हारे से हो गई. पोस्ट तर आम्ही केली आणि कौतुक तुमचे होत आहे.

वाचा-पहिल्या कसोटीच्या पिचवरून पाकिस्तानची इज्जत गेली; ICCकडून बसणार दणका

वाचा- धोनीला मिळाली गुड न्यूज; १४ कोटींची गुंतवणूक वाया जाणार नाही

सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीला क्रेडिट दिले नाही तर अनेकदा कायदेशी कारवाई केली जाते. लखनौ संघाने केलेल्या चुकीवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आणि संघाला माफी मागण्याची वेळ आली. आयपीएलमधील सर्वात महाग संघ ठरलेल्या या संघाची खरेदी संजीव गोयका यांनी ७ हजार ९० कोटी रुपयांना केली होती. या संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. त्याच्या सोबत १७ कोटींचा करार करण्यात आलाय. लखनौची पहिली लढत २८ मार्च रोजी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here