मुंबई: ‘फुलाला सुगंध मातीचा‘ या मालिकेतील कीर्तीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू झालाय. आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कीर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र अखेर जिजी अक्कांनी होकार दिल्यानंतर कीर्तीच्या आयुष्याला आता नवी कलाटणी मिळणार आहे.

आयपीएस ऑफिसर बनण्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीय. यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी लागणार आहे. कीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान असणार आहे. मालिकेतल्या या महत्त्वपूर्ण वळणाबद्दल समृद्धी म्हणाली, ‘मालिकेच्या पहिल्या दिवसापासून कीर्तीच्या आयपीएस ऑफिसर बनण्याच्या स्वप्नाचे प्रेक्षक साक्षीदार आहेत. तिच्यासाठी हे आव्हानात्मक असेलच पण समृद्धी म्हणून माझीदेखील कसोटी लागणार आहे.

जेठालालनं घेतला होता अभिनय न करण्याचा निर्णय, पण त्यानंतर झालं असं की….


मी फारशी फिटनेस फ्रीक नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतेय. या संपूर्ण प्रवासात स्टॅमिना खूप महत्त्वाचा आहे. स्टॅमिना वाढवण्यासाठी योग्य आहाराकडे आणि व्यायामाकडे मी विशेष लक्ष देतेय. याआधी बॉडी डबल न वापरता मी मालिकेत स्टंट सिक्वेन्स केले आहेत. त्यामुळे या पुढच्या खडतर प्रवासासाठी माझी तयारी सुरू झालीय.

मला लहानपणापासूनच खाकी गणवेशाविषयी प्रेम आणि आदर आहे. या मालिकेच्या निमित्त हे सगळं अनुभवायला मिळत आहे याचा आनंद आहे , असंही समृद्धी म्हणते.

‘ कीर्तीचा हा प्रवास आता मालिकेच्या आगामी भागांमधून अनुभवायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here