सांगली : जत तालुक्यातील उमदी गावात दोन गटातील वादामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गट आमने-सामने आल्याने मदगोंडा नागा बगली (वय २४) आणि संतोष राजू माळी (वय २३, दोघेही रा. उमदी) यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली, तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे. (Double Murder Case)

उमदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमदी येथे तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. सोशल मीडियात केलेल्या काही पोस्टवरून दोन्ही गटात वादाला सुरुवात झाली होती. याच वादातून मंगळवारी रात्री उशिरा उमदी-पंढरपूर मार्गावर दोन्ही गट समोरासमोर आले. यावेळी झालेल्या सशस्त्र हल्ल्यात मदगोंडा नागा बगली (वय २४) व संतोष राजू माळी (वय २३) रा. उमदी यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

goa election : गोव्यात काँग्रेस उमेदवारांना नजरकैद केले?, मुख्यमंत्री सावंतांचा हल्लाबोल…

पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

दरम्यान, दुहेरी खुनाच्या घटनेमुळे जत तालुका हादरला असून, उमदी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरुणांच्या दोन गटातील पूर्ववैमनस्यातून आणखी काही तरुणांचे खून पडण्याची भीती उमदी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here