महाड: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांबळे तर्फ महाडजवळ झालेल्या स्फोटामागील कारण लवकरच उलगडणार आहे. एका गुन्ह्यात जप्त केलेली स्फोटके नष्ट करताना हा स्फोट झाला होता. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. ही घटना घडली कशी? त्यामागचे कारण काय याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे, असे सांगण्यात येत आहे.

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांबळे तर्फ महाडजवळ मोठा स्फोट झाला होता. पोलिसांनी एका गुन्ह्यात जप्त केलेली स्फोटके नष्ट करताना हा स्फोट झाला होता. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यातील दोघे गंभीर होते. त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. स्फोटकांची विल्हेवाट लावताना स्फोट झाला कसा? यामागे नेमके कारण काय, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले होते. याबाबत रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. या घटनेची चौकशी समितीमार्फत केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

महाडच्या छबिना उत्सवामध्ये अपघात; आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी
अपार्टमेंटच्या गच्चीवरुन पडल्याने मराठी साहित्यिकाचा जागीच मृत्यू

२०१३ साली माणगाव येथे एका गुन्ह्यात पोलिसांनी कारवाई करताना स्फोटके जप्त केली होती. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जप्त स्फोटकांची विल्हेवाट लावली जाणार होती. महाडच्या परिसरात स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात येत होती. त्याचवेळी स्फोट झाला. त्यात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यातील दोघे गंभीर होते, तर एकाला किरकोळ दुखापत झाली होती. दोघांवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला उपचारानंतर सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी कोकण परीक्षेत्र अधिकारी संजय मोहिते, रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमून यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे, असे दुधे यांनी सांगितले.

एसटी संप: प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंसह सरकारवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here