दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सोनजे आणि माने यांसह इतर संबंधितांबाबत चौकशी सुरू आहे. हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी बुधवारी जबाब नोंदणी सुरू राहिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अचानक गेला तोल; २५ वर्षीय तरुणीने गमावला जीव! – a 25-year-old girl fell from a building and passed awayin nashik city
नाशिक : इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन खाली कोसळल्याने २५ वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे. रुक्मिणी पिराजी बोळे असं मृत तरुणीचं नाव आहे. रुक्मिणी बोळे ही ध्रुवनगरमधील एका इमारतीमध्ये काम करत होती. अचानक तोल गेल्याने तिच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारासह इतर संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Nashik Building)