वृत्तसंस्था, वॉशिंग्टन :

रशियाच्या आक्रमणाशी झुंजणाऱ्या युक्रेनला १३.६ अब्ज डॉलरची मदत करण्यावर अमेरिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झाले आहे. युक्रेनबरोबरच अन्य युरोपीय मित्रदेशांनाही सद्यस्थिती आणि करोनाशी मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या एकूण १५०० अब्ज डॉलरच्या सरकारी खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

रशियाच्या आक्रमणामुळे युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरची निर्वासितांची सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. रशियाच्या या आक्रमणाविरोधात लष्करी, मानवतावादी मदत आणि आर्थिक दृष्टीने १० अब्ज डॉलरची मदत देण्याचे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात केले होते. त्यानंतर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींमधील चर्चेनंतर हा निधी सोमवारी १२ अब्ज डॉलरपर्यंत वाढला आणि त्यानंतर हा निधी १३.६ अब्ज डॉलरपर्यंत वाढला. युक्रेनच्या २० लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. त्यांच्या मदतीसाठी युक्रेन आणि पूर्व युरोपातील देशांना चार अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार आहे. युक्रेनला देण्यात येणाऱ्या निधीपैकी ६.७ अब्ज डॉलरचा निधी अमेरिकेच्या सैन्याची या भागातील तैनाती, युक्रेनला देण्यात येणारी शस्त्रास्त्रे यांसाठी आहे. रशियावरील निर्बंधांनंतर मित्रदेशांना मदत करण्याचाही यामध्ये समावेश आहे.

अत्याचार आणि हिंसक कारवायांविरोधात युक्रेनला आम्ही मदत करणार आहोत, असे बायडेन यांनी जाहीर केले होते. प्रतिनिधीगृहामध्ये बुधवारी हे विधेयक मांडण्यात येणार असून, या आठवड्याच्या अखेरीस सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमतेमुळे खूप उशीर होण्याआधी मदत देण्यासाठी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींकडून घाई करण्यात येत आहे.
volodymyr zelenskyy: रशियासोबत ‘तडजोडी’साठी युक्रेन तयार? ‘नाटो’ संदर्भात झेलेन्स्की यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Ukraine Crisis: रशियाला ‘दहशतवादी देश’ म्हणून घोषित करा, झेलेन्स्की यांची मागणी
अमेरिकेत इंधनाचे दर वाढू लागले

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर, अमेरिकेतील नैसर्गिक वायूंच्या दरांमध्ये वाढ होत आहे. त्यातच, रशियातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयात करण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे, या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका रशियाकडून दररोज सात लाख बॅरेल कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांची आयात करते. यातून, रशियाला अब्जावधी डॉलर मिळत असतात. हा निधी रोखण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडचे रशियावर निर्बंध

रशियावर निर्बंध लादण्याचा ठराव न्यूझीलंडमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्बंधांनंतर न्यूझीलंडला रशियाच्या मालमत्ता गोठवता येणार आहे. तसेच, रशियाची विमाने आणि जहाजे येण्यापासून रोखता येणार आहे. रशियातील श्रीमंतांना निर्बंधांपासून वाचण्यासाठी न्यूझीलंड हे सुरक्षित ठिकाण होऊ नये, यासाठी हे निर्बंध आहेत, याकडे काही लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले.

Ukraine Crisis: खासगी कंपन्यांकडून रशियाची कोंडी; ३०० हून अधिक ‘ब्रॅन्डस’नं घेतली ठाम भूमिकाMiss Bumbum Suzy Cortez: रशिया अध्यक्ष पुतीन यांना ‘हिंसक मनोरुग्ण’ म्हणणारी ‘मिस बमबम’ चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here