ल्वीव्ह, युक्रेन :

नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करणार नाही, असं वचन देणाऱ्या रशियालानं युक्रेनमध्ये नवजात बालकांनाही सोडलेलं नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात दक्षिण पूर्व भागातील मारियुपोल शहरातील एका मॅटर्निटी हॉस्पीटलवरही रशियाकडून बॉम्बवर्षाव करण्यात आला. इथे अनेक नवजात बालकं आणि त्यांच्या मातांवर उपचार सुरू होते.

बुधवारी रशियानं रुग्णालयाला निशाण्यावर घेतल्यानंतर नगर परिषदेच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात रुग्णालयाचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं गेलंय.

Ukraine Crisis: रशियाविरुद्ध झुंजणाऱ्या युक्रेनला अमेरिकेकडून १३.६ अब्ज डॉलरची मदतUkraine Crisis: खासगी कंपन्यांकडून रशियाची कोंडी; ३०० हून अधिक ‘ब्रॅन्डस’नं घेतली ठाम भूमिका
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेक महिला आणि मुलं मलब्याखाली अद्यापही अडकलेल्या अवस्थेत आहेत. या हल्ल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही या हल्ल्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केलाय. हा हल्ला म्हणजे ‘अत्याचार’ असल्याची तीव्र भावना झेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय.

झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख किरलो ताइमोशेंको यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनचे अधिकारी जखमी आणि मृतांच्या संख्येची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

युक्रेनमध्ये तात्पुरता युद्धविराम जाहीर

अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी केलेल्या घोषणेनुसार, हजारो नागरिकांना सुरक्षितपणे कीव्हच्या आसपासच्या शहरांमधून तसेच दक्षिणेकडील मारियुपोल, एनरहोदर आणि वोलनोवाखा, पूर्वेकडील इझुम आणि ईशान्येकडील सुमी या शहरांमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला. युक्रेनला या युद्धामुळे मोठ्या विध्वंसाचा सामना करावा लागतोय. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय.

Ukraine Crisis: युक्रेनमध्ये पाकिस्तानच्या ‘अस्मा’ला भारताचा मदतीचा हात! मानले मोदींचे आभारMiss Bumbum Suzy Cortez: रशिया अध्यक्ष पुतीन यांना ‘हिंसक मनोरुग्ण’ म्हणणारी ‘मिस बमबम’ चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here