Election
उत्तराखंड विधानसभेच्या हाती आलेल्या निकालानुसार,
‘भाजपला २० जागांचे नुकसान होऊ शकतं‘
दरम्यान, ७० जागांच्या या विधानसभेत भाजपला ४१ तर काँग्रेसला २२ जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेला आम आदमी पक्ष काही चमत्कार करेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला २० जागांचे नुकसान होऊ शकतं. कारण, २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ५७ जागा मिळाल्या होत्या, तर २०१२ मध्ये भाजपला उत्तराखंडमध्ये ३१ जागा मिळाल्या होत्या.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसने मोठी संधी हुकवली आहे. कारण, भाजप सरकारने ज्या प्रकारे ५ वर्षात तीन मुख्यमंत्री केले आणि बेरोजगारी, महागाई यांसारख्या समस्या असूनही काँग्रेस पुन्हा सत्तेत येताना दिसत नाहीये. उत्तराखंड निवडणुकीसंदर्भात जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी टक्कर असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सर्व एक्झिट पोलचे कल पाहता, राज्यात भाजपला ३१ ते ३९ जागा मिळतील, तर काँग्रेसला २६ ते ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण सध्या चित्र बदलताना दिसत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ५७ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर काँग्रेस फक्त ११ जागांवर घसरली होती. पण महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना पुन्हा सत्तेत येणं भाजपसाठी मोठं आव्हान आहे. इतकंच नाहीतर भाजपविरोधातील लाटेच्या जोरावर राज्यात पुन्हा सत्तेत येण्याची आशा काँग्रेसला आहे.