अमृतसर : पंजाबमध्ये कोणाचे सरकार होणार यांचे उत्तर आता जवळ जवळ स्पष्ट होत चालले आहे. राज्यातील ११७ जागांवर झालेल्या मतमोजणीचे पहिल्या दीड तासातील कल हाती आले असून आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपचा क्लिन स्वीप केल्याचे चित्र दिसत आहे.

गेली वर्ष, दीड वर्ष पंजाब शेतकरी आंदोलनामुळे चर्चे होते. आता निवडणुकीत पंजाबच्या मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सकाळी साडे दहा वाजता आलेल्या कलानुसार ‘आप’ने ९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस फक्त १३ जागांवर आघाडीवर आहे. अकाली दल आणि भाजप यांना दुहेरी संख्या अद्याप गाठता आली नाही.

राज्यातील दिग्गज नेते पिछाडीवर असून यात मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू आणि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पटियाळा शहरातून १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या ठिकाणी आपचे अजीत पाल सिंग कोहली यांनी आघाडी घेतली आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह भदौड आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. इतक नाही तर राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील पिछडीवर आहेत. अमृतसर ईस्ट विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here