उत्तर प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने
उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात जोरदार टक्कर आहे. सुरुवातीचे कल बघता, भाजप २५९ जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष १२३ जागांवर आघाडीवर आहे. करहल विधानसभा मतदारसंघात अखिलेश यादव हे आघाडीवर आहेत. बसप सात जागांवर, तर काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे. अनेक दिग्गज नेते आघाडीवर आहेत. त्यात योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, पंकज सिंह, अवतार सिंह, भडाना, नाहिद हसन, राजा भैया, केशव प्रसाद मौर्य, शिवपाल यादव यांचा समावेश आहे. तर अजय लल्लू, स्वामी प्रसाद मौर्य, संजय सिंह, मृगांका सिंह हे उमेदवार पिछाडीवर आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत
उत्तराखंडमधील ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीचे कल समोर आले असून, भाजप ४४ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर आहे.
पंजाबमध्ये आप सरकार
पंजाबमधील सर्व जागांचे सुरुवातीचे कल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेसला धक्का देत, जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंतचे कल बघता आप ८९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. भाजप आघाडी पाच, तर अकाली दल आघाडी ९ जागांवर आघाडीवर आहे.
मणिपूरमध्ये भाजपची पुन्हा वापसी?
मणिपूरमधील ६० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीचे कल बघता काँग्रेस १२, तर भाजप २५ जागांवर आघाडीवर आहे.
गोव्यातही भाजप सरकार
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असे सुरुवातीच्या निकालाच्या कलांवरून दिसते. भाजप १९, काँग्रेस १३ आणि अन्य पक्ष ८ जागांवर आघाडीवर आहेत.