मुंबई : उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब, गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास आता सुरुवात झालेली आहे. निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल स्पष्ट झाले असून, कोणत्या राज्यात कुणाची सत्ता येणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. सुरुवातीचे कल बघता, उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजप सत्तेत येणार असं तरी सध्या दिसतं आहे. सुरुवातीचे कल येताच, महाराष्ट्र भाजपने राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील निवडणूक निकाल आता जाहीर होत असून, सुरुवातीचे कल बघता येथील चित्र स्पष्ट झाले आहे. पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांत भाजप सत्तेत येणार असल्याचे चित्र सध्याचे निकालाचे कल बघितले तर स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपकडून जल्लोष केला जात आहे. महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणुका लढवणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा ही ‘नोटा’सोबत असणार हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं, असे ट्विट भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे. नोटाला एकूण किती जणांनी मते दिली, हे सांगितले आहे. नोटाला १.१ टक्का म्हणजेच ६४३९ मते मिळाली आहेत. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला ५०५८ मते मिळाली आहेत. शिवसेनेला १०९९ मते मिळाली. दोन्ही पक्षांची मिळून ६१५७ मते आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची स्पर्धा ही नोटासोबत असल्याचं भाजपने ट्विटमधून दाखवून दिलं आहे. दोन्ही पक्षांचे नेते २०२४ रोजी पंतप्रधान होतील, असाही टोला भाजपने लगावला आहे.