देहरादूत, उत्तराखंड :

उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये सुरुवातीचे कल हाती आलेत. यात, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खटीमा मतदारसंघातून मागे पडलेले दिसून येत आहेत. यामुळे भाजपच्या चिंतेत भर पडलीय.

दुपारी १२.०० वाजेपर्यंत दरम्यान निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, मुख्यमंत्री धामी यांना एकूण ८८६१ मतं मिळालीत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार भुवन चंद्र कापडी यांना एकूण ८८७७ मतं मिळालीत. अर्थात दोन्ही उमेदवारांत केवळ १६ मतांचा फरक दिसून आला. अटीतटीच्या या लढाईत अखेरीस कोण बाजी मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Uttarakhand Assembly Election 2022 Results

उत्तराखंडची भीती खरी ठरणार?

उल्लेखनीय म्हणजे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावर असताना निवडणुकीत पराभवच स्वीकारावा लागतो, असा एक अंधविश्वासाकडे झुकणारा समज राज्यात प्रचलित आहे. गेल्या काही वर्षांच्या निवडणुकांत हा अंधविश्वास काहीशा प्रमाणात खराही ठरलेला दिसून येतो. त्यामुळे हा समज खोटा ठरवत ‘मंख्यमंत्र्यांचा पराभव निश्चित’ हा अंधविश्वास मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खोटा ठरवणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.

Shivsena in UP: ४१ जागा लढवणाऱ्या शिवसेनेची उत्तर प्रदेशात दाणादाण; पाहा काय आहे सद्यस्थितीUttarakhand Election Results : भाजपच्या जागेवर काँग्रेसची कडवी झुंज, पाहा काय आहेत ताजे आकडे
मुख्यमंत्र्यांचं मौन व्रत…

दरम्यान, आज अनेकांचं लक्ष या विधानसभा निकालाकडे लागून असताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मौन व्रत धारण केलंय. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच आपण आपलं मौन तोडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.


माजी मुख्यमंत्री हरीश रावतही पिछाडीवर

दुसरीकडे, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार हरीश सिंह रावत हेदेखील पिछाडीवर पडल्याचं चित्रं दिसतंय. हरीश रावत हे लालकुआ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. उत्तराखंडातील काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार हरीश रावत भाजपचे उमेदवार मोहन सिंह बिष्ट यांनी जोरदार टक्कर दिलीय. दुपारी १२.३० वाजेपर्यंत बिष्ट यांच्याहून रावत जवळपास १२ हजार मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय.

भाजपला दुसऱ्यांदा सत्ता मिळणार?

उत्तराखंडात विजय मिळवण्यात भाजपला यश आलं तर ही पहिलीज वेळ असेल जेव्हा राज्यात एखाद्या पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैंकी ५७ जागांवर विजय मिळाला होता तर काँग्रेसला केवळ ११ जागांवर यश मिळालं होतं.

Election Results 2022 LIVE Updates : यूपीत पुन्हा भाजप सरकार; पंजाबमध्ये आपची लाटपंजाबमध्ये ‘आप’ने केली सफाई; या पाच कारणांमुळे मिळाला विजय
गांधी घराण्याच्या पारंपारिक मतदारसंघात भाजपनं लावला सुरुंग; उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here