मुंबई: मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यांगतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सूचनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यांगतांनी पालन करून मंत्रालयात येताना चेहऱ्यावर मास्क लावूनच प्रवेश करावा, अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times